मुंबई: हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आता नवीन ऑफिस सुरु केलं आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच उर्मिला यांनी नवं ऑफिस खरेदी केलं आहे. कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात उर्मिला यांनी उडी घेत कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या संपादक आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला होता. (Urmila Matondkar bought a new office)
उर्मिला मातोंडकर यांचं नवं कार्यालय लिंकिंग रोड खास वेस्ट परिसरात उभारण्यात आलंय. हे कार्यालय सहाव्या मजल्यावरुन असून, 1 हजार स्वेअर फूट जागेत आहे. या इमारतीत कार्यालयाचं भाडं महिना 5 ते 8 लाख रुपये असल्याची माहिती मिळतेय. उर्मिला यांचं हे कार्यालय तब्बल 3 कोटी 75 लाख रुपयांना घेतल्याची माहिती मिळतेय.
आपल्या नव्या कार्यालयाबाबत विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली, चुकीच्या बातम्या चालवल्याचं स्वत: उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केल्याचं उर्मिला यांनी स्पष्ट केलंय. तसंच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.
With love to #GodiMedia ??@MumbaiMirror @ABPNews @OpIndia_com pic.twitter.com/71tsbvR4wR
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 3, 2021
उर्मिला मातोंडकर यांनी 1 डिसेंबर रोजी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, सर्व भाषांवर प्रभुत्व, राजकीय समज आणि राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी कलाकार कोट्याचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेनेनं राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी उर्मिला यांचं नाव दिलेलं आहे.
अभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 1, 2020
‘हात’ सोडला
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिला यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता.
संंबंधित बातम्या:
राज्यपाल नियुक्त आमदार : सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा