मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद शिगेला पोहचला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. अशातच शिंदे गटातील नेत्यांवर टीका करताना शिवसेना नेते विनायक राऊत(Shiv Sena leader Vinayak Raut ) यांची जीभ घसरली. शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना विनायक राऊत यांनी भर सभेत ‘भ’ ची भाषा वापरली.
शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी आणि सुषमा अंधारे यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दहिसर मध्ये यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, उपनेते विनोद घोसाळकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार विलास पोतनीस आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
खोके भेटले आणि बोके झाले. गद्दारांना गाडण्याचा दिवस आता दुर नाही असे म्हणत विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.
आता मराठी माणुस आठवतोय. ते सुद्धा गुवाहाटी सुरतला जाऊन. आता आठवण झाली मराठी माणुस मुंबईच्या बाहेर गेले याची असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. यावेळी विनायक राऊत यांच्याकडून वाईट शब्दाचा वापर झाला.
महाराष्ट्रला कोणी वाचवलं तर ते शिवसेनेने वाचवलं. आता तुम्ही कोणाची लाचारी करत आहात? तो मराठी आहे का? असे सवाल उपस्थित करत राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला.
अमराठी लोकांचे पाय धुवायचे आणि मराठी माणसांबद्दल बोलायचं. 40 गेले 12 खासदार गेले त्याची खंत नाही. एकनाथ शिंदे आणि 40 चोर आज चाकरी करत आहेत.
105 जणांनी बलिदान दिले आहे. यानंतर मुंबई मिळाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार अजुन बलिदान द्यावे लागले तरी चालेल. देश पुर्ण आमचा आहे. पण मुंबई आमची नाही हीच मोठी खदखद आहे असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना एकट पाडून शिवसेना संपवण्याचा यांचा डाव आहे. पाच पिढ्यांचा इतिहास असलेली ही शिवसेना आहे. 40 गद्दारांच्या बापजादाची कमाई नाही. 10 तोंडाचा रावण जरी आला तरी. शिवसेनेचा धनुष्य बाण सक्षम आहे. वाॉशिंग मशीन मध्ये घातल्या सारखे प्रताप सरनाईक धुवुन आले अशी टीका देखील राऊत यांनी केली.