शिवसेनेची मुलूख मैदानी तोफही नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे.
Ad
गुलाबराव पाटील
Follow us on
मुंबई : शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ म्हणून परिचीत असलेले महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) देखील नॅटरिचेबल असल्याच माहिती आहे. पाटील यांनी आधी समर्थकांना जय महाराष्ट्र पाठवलं आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आधी एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार (MLA) घेऊन गुवाहाटीमध्ये असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित राहिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत असल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उधाण आलंय. तर भाजपकडून सत्तेची तयारी सुरू असल्याच माहिती आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढलं असून कधीही महाराष्ट्र सरकार कोसळू शकतं, असं बोललं जातंय.
आता गुलाबराव पाटील नॅटरिचेबल असल्यानं हे शिंदेंच्या गटात तर गेले नाहीत ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार त्यांच्यासोबत आहे. शिंदेंकडे किती संख्याबळ आहे, हे जाणून घेऊय…