औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज आणि उद्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या शासकीय दौऱ्यात (Aurangabad visit) जनतेच्या हितासाठीचा एकही कार्यक्रम नाही. केवळ शिंदे गटातील आमदारांच्या मतदार संघात मेळावे आणि सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री इथं येत आहेत, अशी टीका शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. आज शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत येत आहेत. त्यानंतर उद्या रविवारी दिवसभर त्यांचे ठिकठिकाणी मेळावे आणि गाठीभेटी आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये सामान्य जनतेच्या हिताचा कार्यक्रम नसल्याचं दानवे म्हणाले. केवळ आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये दौरा घेतला. त्यांच्यासाठी हजारो शिवसैनिक उभे राहिले. याची भीती वाटल्यामुळेच आदित्य ठाकरे जिथे जिथे गेले, त्याच भागात एकनाथ शिंदे यांनी आपला दौरा आयोजित केलाय. मुख्यमंत्र्यांचा मार्गदेखील तसाच आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन पाहिलं. नगरचा व्यक्तीच्या साखर कारखान्याच्या भूमीपूजनासाठी.. अब्दुल सत्तार यांनी उद्धव साहेबांच्या काळात काही जुने कामं केलेत. त्याचं उद्घाटन आहे. बाकी शहरातील महापुरुषांचे पुतळे आहेत, त्यांना हार घालण्याचे कार्यक्रम आहे. जे लोक शिंदे गटात गेलेत त्यांच्या कार्यालयात जाणार आहेत. जनतेच्या हिताचा कोणताही कार्यक्रम या दौऱ्यात दिलेला नाही. एक फक्त बैठक पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आहे. अशा प्रकारचा दौरा असल्यावर सरकारी कामकाज दाखवावं लागतं, या हेतूने ते केलेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी फिरलं पाहिजे.. पण असे खासगी कार्यक्रम करु नयेत.
मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा मदतनिधी जाहीर केला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले, ‘ दिवाळीच्या आधी अतिवृष्टी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी ग्रस्तांसाठी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं. आत्ता शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे. पण सरकारने साधा पंचनामा करण्याचाही निर्णय घेतलेला नाही. तेव्हा दोन ते तीन दिवसात पंचनामे झाले होते. एनडीआरएफचा निकष ३४२ कोटींचा असताना राज्य सरकारने मुद्दाम मोठा निधी दिला होता. आताच्या सरकारनेही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राष्ट्रीय आपत्ती निवारणने महाराष्ट्राला छदामही दिला नव्हता. त्यावेळी मविआचं सरकार हे भाजपाविरोधी होतं तर आता भाजपचंच सरकार महाराष्ट्रात आहे, त्यात शिंदे सहभागी आहेत. तर एनडीआरएफच्या निकषानुसारही मराठवाड्याला मदत निधी मिळाला पाहिजे. महापुरुषांचं पूजन झालंच पाहिजे पण