मुंबई : “सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी 12 जणांची नावं सुचवली आहेत. ही नावं सुचवणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. माझ्या भाषेत ही नौटंकी आहे,” अशी बोचरी टीका शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu) यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर केली. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Shiv Sena MLA Sunil Prabhu criticizes Sadabhau Khot on giving list of 12 governor appointed MLA)
“सदाभाऊ खोत यांनी जी नावं दिली ती मी प्रसारमाध्यमात ना ऐकलं आणि पाहिलं. एका प्रकारच्या या नौटंकीतून लोकशाहीचा अपमान झाला आहे,” असे सुनील प्रभू म्हणाले. तसेच, विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदरकीसाठी जी नावं द्यायची असतात, ती 12 नावं मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार दिली जातात. भारतीय घटनेनुसार या नावांना कॅबिनेटने मंजुरी द्यायची असते असा नियम आहे, असेही प्रभू म्हणाले.
तसेच, सदाभाऊ यांनी अशी नावं देणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. माझ्या भाषेत ही नौटंकी आहे, अशा बोचऱ्या शब्दांत सुनील प्रभू यांनी सदाभाऊंचा समाचार घेतला.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी बुधवारी राज्यपाल भागतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली. त्यांनी रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवली आहेत. तसे पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोतांनी सांगितलं. (The Names Of 12 Members Appointed By The Governor Have Been Suggested By Sadabhau khot)
राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावं सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवण्यात आली आहेत.
Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या अडचणींत वाढ, पगार थकबाकी प्रकरणी कर्मचाऱ्याकडून 2 कोटींचा दावाhttps://t.co/g3az9R3b1C#ShwetaTiwari #RajeshPande
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
संबंधित बातम्या :
राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस
(Shiv Sena MLA Sunil Prabhu criticizes Sadabhau Khot on giving list of 12 governor appointed MLA)