साहेब…जिथे असाल, निश्चिंत रहा! प्राण आहे तोवर भगव्याशी प्रतारणा नाही, ‘या’ खासदाराचा कंठ दाटला, शिवसैनिकही भावूक!

| Updated on: Nov 17, 2022 | 12:00 PM

हाच दिवस... परत या.. परत या...! दर्दभऱ्या घोषणा, अरविंद सावंत यांनी सांगितली आठवण...

साहेब...जिथे असाल, निश्चिंत रहा! प्राण आहे तोवर भगव्याशी प्रतारणा नाही, या खासदाराचा कंठ दाटला, शिवसैनिकही भावूक!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः साहेब, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे निश्चिंत रहा. आमच्यात अजून प्राण आहे. तोपर्यंत या भगव्याशी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही. उद्धव साहेबांसोबत (Uddhav Thackeray) आम्ही सतत आयुष्यभर राहू, एवढंच आजच्या दिवशी सांगतो. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचे अत्यंत भावूक उद्गार आज शिवसैनिकांना मोठं बळ देऊन गेले. स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त अरविंद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी कशाप्रकारे प्रतारणा केली, यावरही सावंत यांनी मनातली खंत बोलून दाखवली.

अरविंद सावंत म्हणाले, मला तो दिवस आठवता. याच शिवतीर्थावर परत या.. परत या अशा दर्दभऱ्या घोषणा सुरु होत्या. काळजाला भिडत होत्या. लाखोंचा जनसमुदाय होता. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं काय तर शिवसेना प्रमुखांनी स्वीकारीत, संस्कारीत केलेली माणसं सातत्याने त्या विचारधारेचा शब्द वापरतात…

मराठी माणसाला एकत्र करताना जात-पात-धर्म बाजूला सोडून द्या, हा तेव्हाचा त्यांचा मोठा विचार होता… ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठ मराठेतर, उच नीच, दलित हे सगळ्यांनी एक होऊ, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. पण आताची माणसं स्वतःच्या जाती सांगत बसतात. तेव्हा कुठे विचारधारा जाते? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.

अरविंद सावंत भावूक, पाहा त्यांचे शब्द काय?

 बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारलेला मराठीचा अभिमान गहाण ठेवल्यासारखा आहे. दोन दिवसावर बेळगावसाठी 69 हुतात्मे शिवसेनेने दिले. पण आता हे लोक झोपलेत. भाजप याच्या विरोधात आहेत. हिंदुत्वाविषयी भ्रम निर्माण केला जातोय आणि मुलभूत प्रश्नांपासून दूर ठेवणं सुरु आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

गद्दारी ही बाळेसाहेबांना अजिबात मान्य नव्हती. भाषावार प्रातंरचना असली तरीही बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दोरा घेतला आणि त्यात सगळ्या राज्यांची फुलं विणली. हा राष्ट्रहिताचा विचार होता. देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर आतंकवाद्यांना बडवणारा खरा हिंदू, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अशी आठवण अरविंद सावंत यांनी सांगितली.