शिंदे गटाकडून ओमराजेंना ‘ही’ ऑफर; पण ओमराजे म्हणतात…

| Updated on: Sep 11, 2022 | 11:48 AM

शिवसेनेला गळती सुरूच आहे. शिवसेनेचे (Shiv sena) अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे.

शिंदे गटाकडून ओमराजेंना ही ऑफर; पण ओमराजे म्हणतात...
Follow us on

मुंबई : शिवसेनेला गळती सुरूच आहे. शिवसेनेचे (Shiv sena) अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे. त्यांनी शिवसेनेत सुरू असलेल्या गळतीवरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला देखील खोका, पेटी, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पदाची ऑफर होती. मात्र आम्ही शिवसेनेबरोबर प्रतारणा केली नाही. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. सध्या अनेक नेते शिवसेनेतून शिंदे गटात (Eknath Shinde) दाखल होत आहेत. या नेत्यांना शिंदे गटातून ऑफर मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

काय म्हटलं ओमराजेंनी?

महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून शिंदे गटावर नेत्यांना ऑफर दिल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला देखील खोका, पेटी, कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर होती. मात्र मी तिकडे गेलो नाही, शिवसेनेसोबत प्रतारणा केली नाही, पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याचं ओमराजे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

अधिवेशनातही तापला होता मुद्दा

दरम्यान शिंदे गटाकडून विरोधी पक्षातील नेत्यांना ऑफर देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून करण्यात आला होता. अधिवेशनामध्ये याच मुद्द्यावरून गोंधळ उडला होता. पन्नास खोके एकदम ओक्के, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील विरोधकांना वाझेचे खोके मातोश्री ओक्के, लव्हासाचे खके सिल्व्हर ओक ओक्के म्हणत प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्या दाव्याने हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.