मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आपण यापूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. पण आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे, अशा शब्दात मोदींनी सर्व आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.(ShivSena MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi)
‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान’, असे दोन ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटो जोडला आहे.
होय
आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे..
जय जवान
जय किसान! pic.twitter.com/3CysKqFrtH— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला.
राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं 13 सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असताना दाखवलं आहे.
ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात@PMOIndia @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @KiritSomaiya @smritiirani #आंदोलनजीवी #RajyaSabha #BudgetSession pic.twitter.com/RleOZuWhzT
— NCP (@NCPspeaks) February 8, 2021
संबंधित बातम्या :
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
मनमोहन सिंगानी जे सांगितलं तेच करतोय, तुम्हाला अभिमान वाटायला हवा; मोदींचा काँग्रेसवर पलटवार
ShivSena MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi