मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा शिवसेनेतील सामना दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं पाहायला मिळतंय. बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परतावेत, यासाठी उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली होती. यावरुन शिंदे गटातील आमदारांनी केलेल्या वक्तव्यांच्या समाचार सामना अग्रलेखातून घेण्यात आला. “मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ” असं वक्तव्य करणाऱ्या बंडखोर शिवसेना आमदाराला शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो’ अशा शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजपवर सामनातून टीका करण्यात आली.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपवर सामानातून निशाणा साधण्यात आला आहे. या अग्रलेखात असं म्हटलंय, की…
‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे डिगारे हे ‘मातोश्री ये वैभव आणि श्रीमंती आहे. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्भव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, “शिवसेना हे कुट्य आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा घरी या” यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विच मारायचा आहे. पण विंचवाचा व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-दुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते.
हे सुद्धा वाचा
महुआ मोईत्रा आणि नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या कारवाईवरुन हिंदुत्वाचा मुद्दाही सामना अग्रलेखातून शिवसेनेने खोडून काढलाय. ‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो. पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मापासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले, असं सामना अग्रलेखात म्हटलंय.
प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रा कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’ वाद धोक्यात आला नाही, अशा शब्दांत निशाणा साधलाय.