मुंबई – मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे (Shivsena) 18 विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज 14 जुलै रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत. मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान 18 शिवसेना नगरसेवक , तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सत्कार करणार आहेत व शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत.
महाविकास आघाडीसोबत आमचं जमत नसल्यामुळे आम्ही बाहेर पडत आहोत असं कारण सांगून शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल. सुरुवातीला त्यांनी गुजरातमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर तिथं सुरक्षा कमी वाटू लागल्यानंतर आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेल गाठलं. गुवाहाटीत गेल्यानंतर अनेक आमदारांनी गुवाहाटी गाठली आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. तेव्हापासून शिंदे गटात अनेकजण जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते म्हणजे आमदार प्रताप सरनाईक हे स्वत: शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सोबत असणारे अनेक आमदार घेऊन गेल्याची चर्चा होती.
मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेतील 18 विद्यमान नगरसेवक आज शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ते एकनाथ शिंदे यांच्या गटात ते सामील होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी सुद्धा आज शिंदे गटात सामील होणार आहे. मीरा भाईंदर शहरात मागील अनेक वर्षात शिवसेना वाढवण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं काम केलं आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना मिरा भाईंदर महापालिकेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार अशी चिन्हं दिसत आहेत.