मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्याबदल्यात शिवसेनेचे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र आमदार सुनील शिंदे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने सुनील शिंदे ((Sunil Shinde) ) नाराज असल्याची चर्चा आहे. सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सुनील शिंदे यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी त्याला इन्कार दिला.
2014 मध्ये वरळी विधानसभेसाठी सुनील शिंदे विरुद्ध सचिन अहिर यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुनील शिंदे यांनी बाजी मारली होती. आता सचिन अहिर यांना शिवसेनेने प्रवेश दिल्यामुळे सुनील शिंदे यांच्या तिकीटावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
या विधानसभेत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होते. सचिन अहिर यांनी तीनवेळा विजय मिळवला होता. मात्र आता सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे, राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात बडा चेहरा नाही. त्याचाच फायदा सुनील शिंदे यांना मिळू शकतो.
कोण आहेत सुनील शिंदे?
संबंधित बातम्या
आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?
राष्ट्रवादी फोडणार नाही, शिवसेना वाढवणार : सचिन अहिर