मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Shiv sena Party) शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? यावरुन राजकारण सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर शिवसेना ही मेळावा हा शिवतीर्थावरच करण्यावर ठाम आहे तर शिंदे गट वेळीच समजेल असे म्हणत आहे. यावर मुख्यमंत्री बोलले असताना पुन्हा (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी (Eknath Shinde) शिंदे गटाला खोके सरकार म्हणून हिणवले आहे. मुद्दा दसरा मेळाव्याचा असला तरी यावरुन आरोप-प्रत्यारोपाचा फैरी ह्या सुरुच आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी दसऱ्याचा कार्यक्रम होणार, तिथे खोके सरकार येऊ शकणार नाही असे विधान आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या सम्राट या मंडळातील बाप्पाच्या दर्शनाला आल्यावर केले आहे.
दसरा मेळाव्यावरुन आरपीआयचे रामदास आठवले यांनी शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यावरुन बीबीसी मैदानाचा पर्याय सांगितला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी इतरांना दसरा मेळाव्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत त्यांना फटकारले आहे. तर महाराष्ट्राची आणि शिवसेनेची संस्कृती ही शिवतीर्थावरच दसरा मेळाव्याची आहे. त्यामुळे ही परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दसरा मेळाव्यावरुन राजकारण तर सुरु झाले आहेच पण याचा त्रास आता अधिकाऱ्यांना देखील होत आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिले असे अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना खोके सरकारमधून दिवसाला एक पत्र दिले जात आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी प्रय़त्न सुरु आहेत. पण सेना मागे सरकणार नसल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे सरकार एकही टीकेची संधी आतापर्यंत शिवसेनेने सोडली नाही. यातच आरोग्य मंत्री यांना हाफकीन ही एक संस्था आहे की दलाल हे देखील माहिती नाही. यावरुन शिंदे सरकारमधील मंत्री कसा कारभार करीत असतील असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर दुसऱ्या एका मंत्र्याने पद घेतले आहे, बंगलाही घेतला आहे पण प्रत्यक्षात कामाला आणखी सुरवातच केलेली नाही. हा सर्व भोंगळ कारभार असून तो जनतेला देखील न पटणारा असल्याचे ते म्हणाले आहेत.