सत्तासंघर्षाच्या निकालावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Sep 27, 2022 | 5:25 PM

कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार. आम्ही निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रीया पुर्ण करू. हा धक्का नाही तर प्रक्रीयेचा एक भाग आहे असे देसाई म्हणाले.

आतापर्यंत आम्ही त्यांची प्रक्रीया पुर्ण करत आले आहोत. मात्र निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुरावे देऊ. आम्हाला पुढच्या सुनावणीत नक्की न्याय मिळेल असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.