औरंगाबाद : शिवसेनेतला (Shiv sena Dispute) अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. आज औरंगाबादेतही (Aurangabad dispute) पुन्हा तेच झालंय. वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या कार्यक्रमात पुन्हा शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. हा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात जोरदार मारमारी झाली आहे. वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर जोरदार मारामारी झाली. युवासेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा यावेळी झाला. शेकडो कार्यकर्ते यावेळी भिडले. तब्बल 10 मिनिटांपासून मारामारी सुरु झाली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलच तापलं होतं. काही काळानंतर हा वाद शांत झाला. मात्र तोपर्यंत चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
सुरूवातीला दोन गट आमनेसामने आल्यानंतर चांगलाच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खेचाखेची सुरू झाली. त्यानंतर हे दोन आपसात भिडले आणि तुबळ हाणामारी झाली. वरूण सरदेसाई निघून गेल्यानंतर हा राडा सुरू झाला. वरूण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात राडा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही त्यांच्या कार्यक्रमात राडा झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. आता या राड्यावर अजून तरी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.
राजेंद्र जंजाळे यांनी या राड्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला माहीत नाही मारामारी करणारे आमचे कार्यकर्ते आहेत का? अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय. तसेच मारामारी करणाऱ्यांची सगळी माहीती घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्यांवर कारवाई केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच राडा करणारे युवासेनेच पदाधिकारी नव्हते, असेही ते म्हणाले आहेत. गेटमधून बाहेर पडताना किरकोळ कारणावरून भांडण झाल्याची माहीती मिळाली आहे, असेही ते म्हणाले. तसेच राडा करणारे बाहेरचे असल्यास आम्ही त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना आता काय कारवाई करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या राड्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, एवढं मात्र नक्की.