Shivsea : शिवसेनेचा तानाजी सावंतांना धक्का, सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी

| Updated on: Jul 10, 2022 | 9:05 AM

शिवसेनेनं तानाजी सावंतांना यांनी धक्का दिलाय. सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून तानाजी सावंत यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे. तानाजी सावंत यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आली आहे.

Shivsea : शिवसेनेचा तानाजी सावंतांना धक्का, सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी
आरोग्यमंत्री तानाजी सावंत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेतून (Shivsea) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. यातच हकालपट्टी देखील शिवसेनेकडून केली जातेय. यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (tanaji sawant) यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे.  सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त शिवसेनेचे मुख्यपत्र दैनिक ‘सामना’मध्ये देण्यात आलंय. तानाजी सावंत यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आल्याची देखील माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना शिवसेनेचा हा धक्का मानला जातोय.

दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं वृत्त

हायलाईट्स

  1. – शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तानाजी सावंत यांना हटवलं
  2. – तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम- परंडा मतदार संघांचे आहेत शिवसेनेचे बंडखोर आमदार
  3. हे सुद्धा वाचा
  4. – शिंदे गटातील नेत्यांना सेनेपासून दूर ठेवाण्याचा ठाकरेंचा प्रयत्न
  5. – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांची नवे संपर्क प्रमुख म्हणून केली नियुक्ती
  6. – सोलापूर युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मनीष काळजेची हकालपट्टी करत नवे युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून बालाजी चौगुलेंची केली नियुक्ती

कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी

एकनाथ शिंदेंसोबत एक एक करत जवळपास 39 शिवसेना आमदार गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जावे, असा इशारा काठावरच्या शिवसैनिकांना दिला होता. स्थानिका पातळीवरदेखील आता दोन गट पडले असून सत्ता हवी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबाजूने जात असल्याचे दिसत आहे. केवळ आमदारच नाही, तर पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येदेखील चलबिचल पाहायला मिळत आहे. यात एकनाथ शिंदेंना सहकार्य करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

आमदारांनंतर खासदारांची गळती

संजय जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. शिवसेनेत आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार असल्याचं दिसतंय. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय शिंदे हे देखील एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याची माहिती आहे.