मुंबई : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण (Aaditya thackeray comment on raut statement) दिलं. “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“संजय राऊत यांनी जे विधान केले आहे. ते वेगळ्या कारणांमुळे केले आहे. करीम लाला हे एक पठान नेते होते. त्यानंतर जे काही असेल ते मला माहित नाही. त्याचे संदर्भ वेगळे होते. त्यांचे निरीक्षण होतं. त्यामुळे जर मुलाखत झाली असेल तरी ती कशी झाली? का झाली? पण आता हा विषय मागे राहिला आहे,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
“इंदिरा गांधींबद्दल स्वत: शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर होता. त्यांच्याबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही. त्यांचा हेतू साफ होता. यापूर्वी किंवा यानंतरही कोणताही शिवसैनिक इंदिरा गांधींबद्दल बोलणार नाही,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
“राऊत यांनी जे कोणतेही विधान केलं असेल. तर त्याबद्दल रेफरन्सने बघणं जरुरीचे आहे. आता त्यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे,” असेही आदित्य ठाकरे (Aaditya thackeray comment on raut statement) म्हणाले.
“गेली अनेक दिवस आम्ही आढावा बैठक घ्यायचो. दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती. मुंबईच्या विकास कामाला वेग द्यायचा आहे. चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, कचरामुक्त मुंबई, रेल्वे परिसर हे सर्व सुधारायचं आहे,” असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.
“उपनगरातील लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे टीम म्हणून काम करण गरजेचे आहे. इथे कोणीही ज्युनिअर किंवा सिनीअर नाही. पर्यावरणाला नुकसान न होता आम्ही चांगलं करायचं आहे. यासाठी आम्ही समिती गठीत करणार आहे,” असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.
“या बैठकीत मुंबईतील अनेक उपाययोजनांवर चर्चा झाली. मिसिंग लिंक डीपी यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. ईस्ट आणि वेस्ट जोडणीच्या परिसराचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. मेट्रोची काम सुरु असलेल्या ठिकाणी बेस्ट आणि पालिका यांची सांगड घालून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. संपूर्ण महाराष्ट्राला ए+ करायचे आहे,” असेही आदित्य ठाकरे (Aaditya thackeray comment on raut statement) म्हणाले.