मुंबई : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यासह देशाचं या बहुमत चाचणीकडे लक्ष लागलं होतं. अश्यावेळी मविआसाठी एक एक मत महत्वाचं आहे. अश्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सभागृहात पोहोचायला उशीर झाला. त्यांच्या या उशीरा येण्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण त्यांची खरी परिक्षा काल आणि आज होती. कारण काल विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आज बहुमत चाचणी पार पडली. एवढ्या महत्वाच्या दिवशी आदित्य ठाकरे अनुपस्थित राहतात की काय, असं वाटत असतानाच ते ऐनवेळी सभागृहात दाखल झाले.
बहुमताचा प्रस्ताव मांडला गेला होता. बहुमत चाचणीला सुरूवात होणार होती. काही क्षणात सभागृहाचे दरवाजे बंद होणार होते. पण आदित्य ठाकरे अद्याप दाखल आले नव्हते, मविआच्या नेत्यांमध्ये धाकधुक होती. ऐन मोक्याच्या प्रसंगी आदित्य ठाकरे दाखल झाले अन् मविआच्या नेत्यांना हायसं वाटलं.
विधानसभेचं कामकाज बरोबर 11 वाजता सुरू झालं. त्यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे सभागृहात हजर नव्हते. आदित्य ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले. तोपर्यंत आवाजी मतदान झालं होतं. विधानभेचे दरवाजे बंद होत असतानाच ठाकरे सभागृहात आले.
शिंदे सरकारची बहुमत चाचणी होत होती. यावेळी कालची अध्यक्षपदाची निवडणूक पाहता शिंदे गट आणि भाजप हा ठराव जिंकेल असं वाटत होतं. पण मविआचे काही नेते या चाचणीला गैरहजर होते. त्यामुळे ते बहुमत चाचणीला मुकले.
झिशान, धीरज देशमुख लेटलतिफ आमदार
बहुमत चाचणीला मुकले@TV9Marathi— mohan deshmukh (@mohanekanshi) July 4, 2022
उशीरा आल्याने अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार बहुमत चाचणीला मुकले.
अशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला मुकले
लेट आल्याने बहुमत चाचणीला मुकले@TV9Marathi @AshokChavanINC— mohan deshmukh (@mohanekanshi) July 4, 2022