रत्नागिरी : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा (BJP Not announce any Candidate from Ratnagiri) करायला सुरुवात केली आहे. नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यातील उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत. रत्नागिरीतील पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जाहीर (BJP Not announce any Candidate from Ratnagiri) झाले असले, तरी भाजपचा मात्र या ठिकाणी एकही उमेदवाराने फॉर्म भरलेला नाही. त्यामुळे रत्नागिरीतून भाजप हद्दपार झाल्याच्या चर्चांना उधाण (BJP Not announce any Candidate from Ratnagiri) आले आहे.
दापोलीतून योगेश कदम, चिपळूणमधून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, रत्नागिरीतून उदय सामंत असे पाच उमेदवार आहेत. भाजपकडून गुहागर मतदारसंघात डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र याबाबतची कोणतीही घोषणा न झाल्याने रत्नागिरीत भाजप हद्दपार (BJP Not announce any Candidate from Ratnagiri) झाल्यात जमा आहे.
रत्नागिरी जिल्हा हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत दापोलीतून चंद्रकांत मोकल, खेडमधून तु.बा.कदम, चिपळूणमधून निशिकांत जोशी, संगमेश्वरमधून मुसा मोडक, रत्नागिरीतून शिवाजी जड्यार, राजापूरमधून लक्ष्मण हातणकर हे काँग्रेसचे, तर गुहागरमधून श्रीधर नातू हे एकमेव भाजपाचे आमदार निवडून आले होते.
पण 1990 च्या विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून लक्ष्मण हातणकर हे एकमेव कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर रत्नागिरीतून शिवाजी गोताड आणि गुहागरमधून श्रीधर नातू हे भाजपाचे आमदार निवडले गेले होते. त्यानंतर 1995 मध्ये रत्नागिरीतून शिवाजी गोताड आणि गुहागरमधून डॉ.विनय नातू भाजपाचे आमदार निवडले गेले होते.
त्याचीच पुनरावृत्ती करत 1999 या वर्षात रत्नागिरीतून बाळ माने आणि गुहागरमधून डॉ.विनय नातू यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून बाजी मारली होती. तर 2004 मध्ये रत्नागिरीतून राष्ट्रवादीचे उदय सामंत, गुहागरमधून भाजपाचे डॉ.विनय नातू यांनी विजयाचा झेंडा रोवला होता. 2009 मध्ये रत्नागिरीतून उदय सामंत आणि गुहागरमधून भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीकडून बाजी मारली होती. 2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रत्नागिरीतून उदय सामंत यांनी शिवसेनेकडून आणि गुहागरमधून भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीकडून आपला आवाज बुलंद केला होता.
यानुसार 2009 मध्ये रत्नागिरीत जिल्ह्यात भाजपचा कोणताही उमेदवार विजयी झालेला नाही. राज्यात भाजपा सत्तेवर येत असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र भाजपाला ओहोटी लागली आहे. आता तर ती शक्यता धूसर आहे.
कारण गुहागरमधून भास्कर जाधव व रत्नागिरीतून उदय सामंत पुन्हा एकदा शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेने पाचही उमेदवार घोषित करून भाजपाला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
2014 मध्ये शिवसेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला 122 तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. मात्र काहींचे मतदारसंघ बदलण्याचे सुतोवाच युतीकडून करण्यात आले आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या ताब्यात असलेले काही मतदारसंघ हे भाजपाकडे जाणार आहेत तर त्या बदल्यात भाजपाच्या ताब्यात असलेले मतदारसंघ शिवसेनेला देण्याचे ठरले आहे. त्यानुसार परंपरागत भाजपाच्या ताब्यात असलेला गुहागर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळाला आहे.
त्यामुळे शिवसेनेकडून भास्कर जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. तर रत्नागिरीतून विद्यमान आमदार उदय सामंत हे शिवसेनेचे आहेत. त्यांचा मतदारसंघ कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजे गुहागर हे शिवसेनेकडे आल्याने भाजपाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. असे असले तरी रत्नागिरी जिल्यातील भाजपाचे कार्यकर्ते आता शिवसेनेला किती मदत करतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
कारण भाजपाचा एकमेव बालेकिल्ला असलेला गुहागर मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने तेथील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असण्याची शक्यता जास्त आहे. एकंदरीत राजकीय साठमारीत रत्नागिरी जिल्ह्यातून भाजपा हद्दपार झाली आहे.