जालना : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खूप चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकांदरम्यान ते एकत्र बसले आणि एका तासात युती (babanrao lonikar on bjp shivsena government formation) झाली. त्यामुळे आताही येत्या एक दोन दिवसात सर्व वातावरण निवळून जाईल. 1000 टक्के शिवसेना भाजप युतीचे सरकार येईल आणि त्यात मी मंत्री असेन,” असा दावा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. जालन्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले असताना (babanrao lonikar on bjp shivsena government formation) त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यासारख्या भाजप-शिवसेनेच्या दिवंगत नेत्यांनी 35 वर्षापूर्वी युती केली होती. शिवसेना हा मित्रपक्ष आहे,” असेही लोणीकर म्हणाले.
लोकांनी भाजप शिवसेना युतीला जनाधार दिलेला आहे. भाजपकडे 120 आमदार आहेत. तर शिवसेनेकडे 60 आमदार आहेत. शिवसेना-भाजप युतीचं सरकार यावं अशी 11 कोटी जनतेची इच्छा आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी त्यात विष कालवते आहे. अन्नामध्ये मीठं कालवतं असल्याचा आरोपही लोणीकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केला (babanrao lonikar on bjp shivsena government formation) आहे.
“आमच्या खेड्याकडे एक म्हण आहे, शिक्याचा पाय तुटला आणि मांजरीचं पांग फिटलं. पण इथे शिक्याचा पाय तुटणार नाही आणि मांजरीचे पांगही फिटणार नाही,” असेही लोणीकर म्हणाले.
“काँग्रेस राष्ट्रवादीने आमच्या मित्रपक्षाला पाठींबा देण्याचं प्रश्नच उरत नसल्याचं बबनराव लोणीकर म्हटलं. त्यांच्या पायावर ते कुऱ्हाड हाणून घेणार धोंडा पाडून घेणार नाही, असं देखील म्हणायला विसरले नाहीत. शिवसेनेची आणि भाजपाची विचारधारा हिंदुत्व आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी असल्याचं लोणीकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठींबा देणे अशक्य आहे, असा दावा लोणीकरांनी (babanrao lonikar on bjp shivsena government formation) केला आहे.”
जालन्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, “माझा बळीराजा संकटात आहे. त्यामुळे मी मुंबईत थांबून काय करणार. या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. तानाजी मालुसरे यांनी सांगितल्याप्रमाणे, आधी लगीन कोंढाण्याचे म्हणजे अगोदर माझा शेतकरी यांना मदत मिळवून देणे. माझे पहिल्या यादीत नाव आहे का? दुसऱ्या यादीत हे मला माहीत नाही. पण मी यादीत आहे हे मला नक्की माहीत आहे असेही त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हटलं आहे.”
संबंधित बातम्या :
“शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा”
चर्चा शिवसेनेनं थांबवली, आता त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू: माधव भांडारी