शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी हात सोडला सैल

| Updated on: Feb 27, 2021 | 11:17 AM

स्थायी समितीच्या 650 कोटी निधीपैकी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 227 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या वाटपात मात्र मोठी तफावत आहे. | BMC BJP Shivsena

शिवसेनेनं भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी हात सोडला सैल
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us on

मुंबई: महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत (Mumbai BMC Election 2022) सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजपने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनाही प्रशासकीय डावपेच खेळून भाजपची कोंडी करताना दिसत आहे. (Shiv Sena give less fund to bjp corporators in Mumbai)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता जेमतेम वर्षभराचा अवधी उरला आहे. अशावेळी नगरसेवकांकडून पाच वर्षातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपापल्या प्रभागात नवे प्रकल्प हाती घेतले जातात. साहजिकच त्यासाठी निधीची गरज लागते. मात्र, शिवसेनेने निधीवाटपात भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच कोंडी केली आहे.

शिवसेनने आपल्या नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांसाठी हात सैल सोडला आहे. तर भाजप नगरसेवकांच्या आर्थिक नाड्या शिवसेनेनं आवळल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये यावरुन संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांना किती निधी?

स्थायी समितीच्या 650 कोटी निधीपैकी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 227 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या वाटपात मात्र मोठी तफावत आहे. महापालिकेत शिवसेनेचे 97 नगरसेवक असून त्यांना 233 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. तर भाजपचे 83 नगरसेवक असून त्यांना 60 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
काँग्रेसचे 29 नगरससेवक असून त्यांना संख्येच्या तीनपट म्हणजे 90 कोटींचा निधी देण्यात आला. राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक असून त्यांना 21 कोटी, तर समाजवादीचे सहा नगरसेवक असून त्यांना 18 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु

भाजप येणार, मुंबई घडवणार, मुंबई जिंकण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकलं

(Shiv Sena give less fund to bjp corporators in Mumbai)