बुलडाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. आता त्यांनी नवं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत गावांत असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करु, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. (Shivsena Buldhana MLA Sanjay Gaikawad Controvercial Statement Over Atrocity Act)
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वाघ कुटुंबावर 19 जूनला हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडलाय. बुधवारी चितोडा गावाला बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. तसंच बोलण्याच्या नादात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्त्र अस्त्र, सर्व ताकद पुरवीन, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं
ॲट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या, असं म्हणत चितोड्यात येण्यासंदर्भात आपल्याला थेट ‘मातोश्री’वरून आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन, असं आमदार गायकवाड म्हणाले.
बिहार आणि उत्तरप्रदेशला लाजवणारा हा हल्ला आहे. गुंडगिरी या गावात फोफावली आहे. ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात. अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येने असल्याने आणि संघटित नसल्याने इथे वारंवार हल्ले होतात. मागच्या एका प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडूनही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पोत्याची दहशत तयार झाली आणि दुर्दैवाने सगळ्या समाजानेही त्याला साथ दिली.
गावगुंडाचे समर्थन लोक करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्यावर कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या 25 गावांच्या तरुण पोरांची संघटित टीम बनवा. अन्याय होईल तेव्हा सर्व जण तुटून पडा. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात सरळ करेन, असेही आमदार गायकवाड म्हणाले. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्त्र अस्त्र, सर्व ताकद पुरवीन, असंही आमदार गायकवाड म्हणाले.
(Shivsena Buldhana MLA Sanjay Gaikawad Controvercial Statement Over Atrocity Act)
हे ही वाचा :
Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं