मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर दिसत (ShivSena Congress meeting tomorrow) आहे. राज्यात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या दिल्लीत बैठक होणार (ShivSena Congress meeting tomorrow) आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीची तारीखही निश्चित झाली आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे या दोन्ही बैठकीकडे राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले (ShivSena Congress meeting tomorrow) आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो का याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यावर चर्चेसाठी उद्या (17 नोव्हेंबर) शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो का? यावर चर्चा होणार आहे. दरम्यान ही बैठक नेमकी मुंबईत, महाराष्ट्रात होणार की दिल्लीत याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
“निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापनेत अपयशी ठरल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यातून आम्ही पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यादृष्टीने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का याची आम्ही पडताळणी करत आहोत. याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नेतेमंडळी यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही हा निर्णय होणार आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण (ShivSena Congress meeting tomorrow) म्हणाले.
तसेच “राज्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही पर्यायी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत.” असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
Prithviraj Chavan, former Maharashtra CM and Congress leader: We are trying to find whether Shiv Sena, Congress & NCP can come together. There is a meeting tomorrow between the leaders of Shiv Sena & Congress. We will find out if we can go ahead or not. pic.twitter.com/fjfEwILMxB
— ANI (@ANI) November 17, 2019
दरम्यान आज पुण्यात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. या उद्या (18 नोव्हेंबर) शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील महासेनाआघाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नेमकी कुठे आणि किती वाजता होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही बैठक दिल्लीत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसची अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकांमध्ये महासेनाआघाडीबाबत नेमका काय निर्णय होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची तारीख ठरली, महासेनाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा ?
पुण्यातील बैठकीनंतर शरद पवार आणि सोनिया गांधीच्या भेटीची तारीख ठरली