Dipali Sayyad : ठाकरे- शिंदे एकत्र येण्यासाठी दिपाली सय्यद यांचा पुढाकार, घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

| Updated on: Jul 13, 2022 | 3:50 PM

Eknath Shinde : दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Dipali Sayyad : ठाकरे- शिंदे एकत्र येण्यासाठी दिपाली सय्यद यांचा पुढाकार, घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी इच्छा शिवसेनेच्या तसंच शिंदे गटाच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली. दिपाली सय्यद त्यापैकी एक. त्या वारंवार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकत्र यावं, अशी इच्छा बोलून दाखवतात. आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येण्याची विनंती केली आहे. शिंदेसाहेब तुम्ही परत मातोश्रीवर या एकदा उद्धवजींशी बोला सगळं नीट होईल, अशी विनंती त्यांनी केल्याची माहिती आहे. आज गुरुपौर्णमेच्या निमित्त त्यांनी ही भेट घेतली.

“साहेब तुम्ही परत या”

दिपाली सय्यद त्यापैकी एक. त्या वारंवार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा बोलून दाखवतात. आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येण्याची विनंती केली आहे. शिंदेसाहेब तुम्ही परत मातोश्रीवर या एकदा उद्धवजींशी बोला सगळं नीट होईल, अशी विनंती त्यांनी केल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

दिपाली यांनी काल एक ट्विट केलं होतं. ज्याची खूप चर्चा झाली. “शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही.तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?”, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

भाजपला शिंदे-ठाकरे मनोमिलन नको?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी इच्छा शिवसेनेच्या तसंच शिंदे गटाच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली. पण या दोन नेत्यांचं मनोमिलन घडू नये, अशी भाजपची इच्छा असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसल्याची माहिती मिळतेय.