मावळचा शिवसेनेचा पहिला खासदार पुन्हा स्वगृही, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कारण, मावळमधून शिवसेनेचे पहिले खासदार गजानन बाबर पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 2014 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड […]

मावळचा शिवसेनेचा पहिला खासदार पुन्हा स्वगृही, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Follow us on

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कारण, मावळमधून शिवसेनेचे पहिले खासदार गजानन बाबर पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

2014 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाबर यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि एकदा खासदारकी भूषवली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीला म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुलासाठी अजित पवार सध्या मावळमध्ये तळ ठोकून आहेत. तर शिवसेनेनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

चार पुतणे पवारांसाठी मैदानात

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी चार दिग्गज नेत्यांचे पुतणे मैदानात आहेत. यामध्ये स्वत: शरद पवारांचे पुतणे अजित पवार, स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे, बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप आणि थेट पार्थ पवार यांचा प्रचार करत नसले, तरी शिवसेना-भाजपविरोधात प्रचार करत असलेले राज ठाकरे यांचा समावेश आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. त्यांनी पनवेलमध्ये जाहीर सभा घेत भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं. पनवेलचा समावेश मावळ मतदारसंघात आहे.

संबंधित बातम्या :

बाळा भेगडेंनी अजित पवारांच्या कानात सांगितलं, बारामती भाजपच जिंकणार

अवघ्या 60 तासात 29 स्टार प्रचारक मावळमध्ये, पवारांसाठी 4 पुतणे मैदानात!