रत्नागिरी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देखते है याचा परिणाम काय झाला, त्यांना कळलं असेल, असा टोला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. देखते है म्हटल्यावर काय परिस्थिती होऊ शकते यावरून त्यांनी बोध घ्यावा, अशी खोपरखळी उदय सामंत यांनी भाजपचं नाव न घेता लगावलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद खोलीतील चर्चेसंदर्भात अमित शहा यांनी देखते है, असं म्हटलं असणार ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हो, असं वाटलं असणार असा खुलासा केला होता. (Shivsena leader Education Minister Uday Samant take jibe of BJP over remark of Chandrakant Patil)
मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह यांनी ‘देखते हैं’ असं म्हटलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याचा अर्थ ‘हो’ असा घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सांगली महापौर निवडीचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणेच काही झालं असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. कारण, शेवटी हे राजकारण आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर देखते है म्हटल्यावर काय परिस्थिती होऊ शकते यावरून त्यांनी बोध घ्यावा, अशी खोपरखळी उदय सामंत यांनी भाजपचं नाव न घेता लगावली.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे. या प्रकरणात मुलीच्या वडील आणि पोलिसांची प्रतिक्रिया आली आहे. ही घटना दुदैवी आहे. सर्वांनी या संदर्भातील भुमिका सष्ट केलीय. मी या प्रकरणात आणखी काय सांगणार, असं सांगत शिवसेनेनी या प्रकरणात सावध प्रतिक्रिया नोंदवलीय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर अतुल भातखळकर आणि चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आलेत. या प्रकरणात पोलीस चौकशी करतील. धमकी देणारे कोण आहेत हे पोलीस शोधून काढतील, धमकी मिळालेल्या व्यक्ती लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असं सांगत ज्यांनी धमकी दिली ते कॉल रजिस्टर येईल. पोलीस त्यांचा शोध घेतील अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
अमित शाह यांनी कणकवली येथील कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, असा खुलासा केला. तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शाह यांनी म्हटले होते.
अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला!, ‘त्या’ बंद दाराआडच्या चर्चेचा चंद्रकांतदादांकडून उलगडा? https://t.co/XI4lwlbxeq @ChDadaPatil @AmitShah @OfficeofUT @rautsanjay61 @Dev_Fadnavis #MaharashtraCM #ChandrakantPatil #uddhavThackeray #ShivSena #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या
बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका
वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?; अरविंद सावंतांनी उडवली खिल्ली
(Shivsena leader Education Minister Udaya Samant take jibe of BJP over remark of Chandrakant Patil)