मुंबई : “काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मी समर्थक आहे. काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावे, त्यांच नेतृत्व उभं राहू नये, यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत,” असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांना यांना नुकतंच लीलावती रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत संजय राऊतांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut Comment on Rahul Gandhi)
“काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रमुख नेते आहे. पण ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारुन पुन्हा कामाला लागावं, या मताचा मी आहे. काँग्रेसने काही ठिकाणी झोकून काम करावं. निकालाची किंवा निर्णयाची परवा करु नये. हे लोकांना जेव्हा दिसेल. तेव्हा लोकं तुमच्या मागे उभे राहतात,” असे संजय राऊत म्हणाले.
“राहुल गांधींच्याबाबत अनेकदा अशी विधान होत असतात. मी राहुल गांधींचा समर्थक आहे. सर्वांना पंडित नेहरु, पंतप्रधान मोदी, शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकांच्या मर्यादा असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे जे काही सांगणं ते मार्गदर्शक म्हणून स्वीकारायला हवं. ते जे काही सांगतात. तेव्हा त्यांचा अभ्यास असतो. आम्हीही पवारांचं मार्गदर्शन घेतो. प्रत्येकाने अहंकार आणि इगो विसरुन ते जे काही सांगतात. त्यांचं ऐकायला हवं, असे संजय राऊतांनी सांगितले.
काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावे, त्यांच नेतृत्व उभं राहू नये. यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. हे सत्य असेल, तरी राहुल गांधी उभे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या व्होट बँकेत अनेक वाटेकरी निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसची जागा ही राष्ट्रवादीने घेतली आहे. ते मूळचे काँग्रेसचे आहेत. प्रादेशिक अस्मिता वाढल्याने काँग्रेसचे महत्त्व कमी झालं आहे, असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले.
नवी दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. अकाली दलाचे प्रमुख नेते मुंबईत येतात. ते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतील. यानंतर पुढील रणनिती ठरवली जाईल,” असे संजय राऊतांनी सांगितले. (Sanjay Raut Comment on Rahul Gandhi)
होर्डिंग जाहिरातदारांप्रमाणे सामान्यांना करातून सूट द्या; विरोधी पक्षाचा महापालिकेच्या स्थायी समितीतून सभात्यागhttps://t.co/Rf7cDbCV1z
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2020
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं; म्हणाले, ‘आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय’