मुंबई : “बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, कर नाही त्याला डर कशाला?” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Sanjay Raut Comment on Shivsena aggressive stance against ED)
गेल्या काही दिवसांपासून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
ह्या बातम्या चुकीच्या आहेत.
रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस
कायद्यानेच चोख उत्तर देऊ.
कर नाही त्याला डर कशाला?
शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो. pic.twitter.com/n2pxBfxpBn— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2021
गेल्या काही दिवसांपासून ED कडून शिवसेना नेत्यांना नोटीस बजावण्यात येत होत्या. त्यातच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहितीही समोर येत होती. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊतांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे.
वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Sanjay Raut Comment on Shivsena aggressive stance against ED)
संबंधित बातम्या :
शिवसेना ED विरोधात आक्रमक, 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता
संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?