मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या (AIIMS) फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी सुशांतचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी केली आहे. यावर ‘आता सीबीआयवरही विश्वास नाही का?’, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुशांतच्या वकिलांना टोला लगावला आहे (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case).
‘सुशांतच्या वकिलांनी नव्या पथकाची मागणी केली आहे, करू द्या. केजीबी, सीआयएची टीम आणली तरी हरकत नाही. यांच्या या मागणीचा अर्थ, त्यांचा आता सीबीआयवरही विश्वास उरला नाहीय. सुप्रीम कोर्टवरदेखील विश्वास नाहीय. काय बोलणार आता!’, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विकास सिंह (Vikas Singh) यांना टोला लगावला आहे.
‘एका युवा अभिनेत्याचा मृत्यू होतो, ही घटना वेदनादायक आहे. त्याचा तपास नक्की करावा. आम्हाला त्यावर काहीच हरकत नाही. परंतु, पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते आहे’, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
‘डॉ. गुप्ता हे काही शिवसेनेचे नाहीत. त्यांनीच रिपोर्ट दिलाय, ते एम्सचे हेड आहेत. हे भाजपचेच कट कारस्थान आहे. स्वतःचे हित साधण्यासाठी हे लोक सुशांतच्या कुटुंबालाही बदनाम करत आहेत’, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)
It is as per the reports of Dr Sudhir Gupta, who is the head of AIIMS Forensic Medical Board in #SushantSinghRajput death case. He doesn’t have any political connection or any links with Shiv Sena: Sanjay Raut, Shiv Sena on reports that AIIMS has stated it to be a case of suicide pic.twitter.com/BpXRuAx8DS
— ANI (@ANI) October 5, 2020
एम्सच्या अहवालानंतर सुशांतचे वकील विकास सिंह यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी विकास सिंह (Vikas Singh) यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे (AIIMS report) मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे.’
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्ट अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’ (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.
(Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी
Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा