मुंबई : पहिल्यांदाच आमदारपदी विराजमान झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आता ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री असं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदाच (Aditya Thackeray Shivsena Minister) पाहायला मिळणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. आदित्य यांना कुठले खाते मिळणार याचीही उत्कंठा आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत.
आदित्य ठाकरे हे संसदीय राजकारणात उतरलेले ठाकरे कुटुंबाचे पहिलेच सदस्य होते. विधानसभा निवडणुकीतील सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. ठाकरे पितापुत्राने एकत्रितपणे संसदीय राजकारणात पदार्पण केल्यानंतर आता पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री अशी अनोखी जोडगोळी पाहायला मिळणार आहे.
Sources: Shiv Sena leader Aditya Thackeray to take oath as state minister today (file pic) #Cabinetexpansion #Maharashtra pic.twitter.com/0PD1RU4wgf
— ANI (@ANI) December 30, 2019
गेल्या महिन्याभरात आदित्य ठाकरे यांचा ठाकरे सरकारमध्ये हिरीरीने सहभाग पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची पूर्वीपासून चर्चा होती.
शिवसेनेचे मंत्री
संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ)
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव)
दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)
अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)
आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)
बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)
ठाकरे सरकार
सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले होते.
Aditya Thackeray Shivsena Minister
संबंधित बातम्या :
अजित पवार, आव्हाड, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?
अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी
ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी