निलेश राणे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात, शिवसेना आमदाराचा आरोप

| Updated on: Feb 19, 2021 | 4:49 PM

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात. (Vaibhav Naik Criticise Nilesh Rane)

निलेश राणे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात, शिवसेना आमदाराचा आरोप
निलेश राणे, माजी खासदार
Follow us on

सिंधुदुर्ग : “भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. राज्य सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास मनाई केली आहे. मात्र हे आदेश झुगारून निलेश राणेंनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी टीका केली. (Vaibhav Naik Criticise Nilesh Rane)

“माजी खासदार निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात. सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. या किल्ल्यातील पाणी योजनेसाठी राज्य सरकाराने 5 कोटी निधी दिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे,” असेही वैभव नाईक म्हणाले.

वैभव नाईक यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी ही टीका केली.

आदेश झुगारुन निलेश राणे सिंधुदुर्ग किल्ल्यावर 

दरम्यान निलेश राणे यांनी राज्य सरकारचे मनाई आदेश झुगारुन आज (19 फेब्रुवारी) शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली. ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.

“शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. याठिकाणी शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे,” असे निलेश राणे म्हणाले.

(Vaibhav Naik Criticise Nilesh Rane)

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकार ‘चायना मेड’ डुप्लिकेट सरकार, शिवाजी महाराजांवरील प्रेम हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा : निलेश राणे

धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, बलात्काराच्या आरोपानंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे