नांदेड : ग्रामीण विकासाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत आणि शासन निर्णयानुसार परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने शासकीय किंवा निमशासकीय सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास निर्बंध आणले होते. त्यामुळे गतवर्षांपासून ग्रामसभा घेणे सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास काही प्रमाणात मंदावला आहे.
ग्राम विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे, असं सांगत ग्रामपंचायत कोरोनाचे नियम पाळतील, पण त्यांना ग्रामसभा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षापासून ग्रामसभा घेणं सुद्धा बंद करण्यात आले होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत DPR बनविण्याचे काम, 15 व्या वित्त आयोगातील आराखडे तयार करणे, गावातील नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमी योजना कामाच्या निवडीचे लेबर व बजेट मंजुरी वनहक्क दावे मंजूर करणे, यासह इतर विकासात्मक कामे खोळंबली आहेत.
त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसभा या राज्य शासनाच्या नियमानुसार आणि कोरोनाचे नियम पाळून घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मागणी केली आहे.
(Shivsena MP Hemant patil demand restart Gramsabha to CM Uddhav Thackeray)
हे ही वाचा :
नांदेड जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा सन्मान, विष्णुपुरी जलाशयाजवळ स्मारक होणार