अहमदनगर : राज्यातील आघाडीत अहमदनगरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालंय. शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. संबंधितांनी दौरा करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी लोखंडे यांनी केलाय. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला या पाहणी दौऱ्या डावलल्यामुळेच शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे आक्रमक झाल्याचं बोललं जातंय (Shivsena MP Sadashiv Lokhande demand FIR against Jayant Patil Balasaheb Thorat and many other).
VIDEO: जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांवर गुन्हे दाखल करा, शिवसेना खासदाराची आक्रमक मागणी@Jayant_R_Patil @bb_thorat @ShivSena @INCMaharashtra @NCPspeaks pic.twitter.com/MxLhSBZjlQ
— Pravin Sindhu ??✊ (@PravinSindhu) May 22, 2021
“निळवंडे कालव्याच्या पाहणीसाठी 100 पेक्षा अधिक लोक जमले”
निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा आज (22 मे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरेंसह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 100 पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे केली आहे. या पाहणी दौऱ्यावेळी सोशल डिस्टंसिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केलाय.
“शेतकरी जमले तरी माझ्यावर गुन्हा, मग यांना वेगळा न्या का असावा?”
सदाशिव लोखंडे म्हणाले, “डाव्या कालव्याच्या पिंपरी निर्मळ येथे बंद पडलेले काम चालू करण्यासाठी गेलो असताना परिसरातील शेतकरी जमा झाले. असं असतानाही त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मग यांना वेगळा न्याय का असावा. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी.”
“मर्जीतील ठेकेदाराची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न”
“संबंधित कामे चालू करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलावले होते. मात्र मर्जीतील ठेकेदाराची मर्जी सांभाळण्यासाठी यावेळी संबंधित अधिकारी कोरोनाचे नाव व जमावबंदीचे कारण सांगून आले नव्हते. मग आज कोरोनाचे कोणतेही नियम का लागू नव्हते,” असाही प्रश्न खासदार लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.
“2 वर्षांपूर्वीच्या कामांचे दौरे करण्यापेक्षा एक वर्षात लाभक्षेत्राला पाणी द्या”
सदाशिव लोखंडे म्हणाले, “गेल्या 50 वर्षांपासून दुष्काळी भागातील शेतकरी पाण्याची वाट पाहत आहे. संगमनेर जवळील घुलेवाडी परिसरातील कामाला कोणतीही गती नाही. टेल कॅनोलची वर्क ऑर्डर होऊनही कामे सुरु नाही. याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. अधिकारी त्याच त्याच कामाचे सातत्याने पाहणी दौरे काढून काय साध्य करू पाहत आहेत?” त्यामुळे अधिकाऱ्यांनी 2 वर्षांपूर्वी झालेल्या कामाचा पाहणी दौरे आयोजित करण्यापेक्षा एक वर्षात लाभक्षेत्राला पाणी कसे मिळेल हे पाहिले पाहिजे असा सल्लाही खासदार लोखंडे यांनी दिला आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Shivsena MP Sadashiv Lokhande demand FIR against Jayant Patil Balasaheb Thorat and many other