मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक झाली होती. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मात्र संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीचा भूमिका आहे. राऊतांच्या जामीनाला ईडीचा विरोध आहे. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) त्यांना हजर केलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांना आज जामीन मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे.