‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

| Updated on: Sep 04, 2021 | 8:51 PM

राज्यपाल हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नक्कीच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. सरळमार्गी गृहस्थ आहेत. पण शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील', अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावलाय.

राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत
Follow us on

खेड : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसून येत नाहीत. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं या नेत्यांनी सांगितलं. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत आज खेडमध्ये बोलत होते. (Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari)

‘राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. त्यांची नेमणूक ही राजकीय असते. ते तटस्थ असतात का तर अजिबात नाही. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. राज्यपाल हे केंद्रात भाजपचे मंत्री होते. राज्यपाल हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नक्कीच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. सरळमार्गी गृहस्थ आहेत. पण शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील’, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावलाय.

आमदार दिलीप मोहितेंना इशारा

खेड पंचायत समिती सभापती निवडणुकीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. शिवसेनेचं बहुमत असूनही खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज खेड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय.

‘पक्षात थोडी शिस्त आणली की दिलीप मोहीते घरी बसतील’

पक्षात थोडी शिस्त आणली की दिलीप मोहीते घरी बसतील. आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलं आहे, अशा शब्तात राऊत यांनी पुन्हा एकदा खेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे. सत्ता हा आमचा आत्मा किंवा प्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ आहे. विद्यमान आमदारांना थोडी जरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं. आघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात. मात्र हे आमदार महाशय… जे काही घडलं त्याची नोंद ठेवली आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलत आहेत, उद्या आम्ही त्यांना उचलू. राजकारणात आमचा पिढीजात धंदा तो आहे. राजकीय कार्य़कर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं, असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या :

VIDEO: भाजपाला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली; पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांची जहरी टीका

‘मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही’, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari