ही हत्या नव्हे, बलिदान! शशिकांत वारिसेंच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करा, संजय राऊत आक्रमक!

| Updated on: Feb 17, 2023 | 12:58 PM

ज्याचे गृहमंत्री एक सभा घेतात. रिफायनरीच्या प्रकल्पात कोण आडवं येतंय, ते पाहू म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी पत्रकाराची हत्या होते, हा योगायोग नाही,असा संशय राऊत यांनी व्यक्त केला.

ही हत्या नव्हे, बलिदान! शशिकांत वारिसेंच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करा, संजय राऊत आक्रमक!
Image Credit source: social media
Follow us on

दिनेश दुखंडे, रत्नागिरीः राजापूर तालुक्यातील रिफानरिविरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) यांची हत्याच झाली, असा आरोप शिवसेना आणि संजय राऊत यांनी केला आहे. त्याही पुढे जाऊन ही हत्या नाही तर जनतेच्या भूमिका मांडण्यासाठी केलेलं हे बलिदान आहे. वारिसे यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. शिवसेना नेते अंबादास दानवे, संजय राऊत, राजन साळवी हे आज वारिसे यांनी आज वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. तसेच या घटनेचा तपास कुठवर आला आहे, यासंदर्भातील माहिती घेतली.

‘५० लाखांची मदत हवी’

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘ वारिसे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्यावेत, ही आमची मागणी आहे. ही हत्या नाही. बलिदान आहे. कुटुंबियांना आधार म्हणून ही रक्कमही कमी आहे. कुटुंबियांचा आक्रोश सरकारने ऐकला आहे. मुख्यमंत्री कालपासून कोकणात आहेत. त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

‘प्रकरण दडपलं जातंय’

संजय राऊत म्हणाले, ‘ वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा मोठा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. म्हणजेच स्थानिक पोलिसदेखील दबावाखाली काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

बिहारसारखी गुंडगिरी…

संजय राऊत म्हणाले, ‘ पूर्वी बिहारमधील गुंडगिरीची उपमा दिली जायची. आता बिहारलाच महाराष्ट्राची उपमा दिली जाते, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ पूर्वी अशा घटना बिहारमध्ये घडत होत्या. आता बिहारला म्हटलं जातंय, तुमचा महाराष्ट्र झालाय का? ही हत्या साधी नाही. लोक ठरवत असतात, काय हवंय, काय नको. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जातो. त्यामागे कोण आहे, याचा तपास करावा.. हा तपास स्वतंत्रपणे निःपक्षपाती होईल का ही आजही शंका आहे.यात राजकीय षडयंत्र आहे. शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात सातत्याने लिहित होता. त्यातून ही हत्या झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.

SIT निःपक्ष तपास करेल?

गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र तीदेखील निःपक्ष तपास करेल का, यावरून संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ११ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. ते कोण आहेत? या देशात कोणतीही यंत्रणा स्वतंत्र नाही. न्यायालयापासून अनेक संस्थांवर राजकीय दबाव आहेत. त्याखालीच कारवाया चालतात. या खुनाचा तपास त्या पद्धतीने होईल का? हा तपासाचा विषय आहे

ते वक्तव्य योगायोग की आणखी काही?

संजय राऊत म्हणाले, ‘सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे. श्रीधर नाईक, सत्यविजय राणे, रेश गोवेकर, हे लोण इथपर्यंत आलंय. ही एकच साखळी आहे. आंगणेवाडीच्या जत्रेत ते प्रमुख नेते उपस्थित होते. मी इथे नाव घेत नाही. पण राज्याचे गृहमंत्री एक सभा घेतात. रिफायनरीच्या प्रकल्पात कोण आडवं येतंय, ते पाहू म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी पत्रकाराची हत्या होते, हा योगायोग नाही,असा संशय राऊत यांनी व्यक्त केला.