नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना दिल्लीत शिवसेनेची डिनर डिप्लोमसी पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. आता भाजप खासदारही डिनरला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. (Shivsena MP Sanjay Raut Dinner Diplomacy invites all Maharashtra MPs for Dinner at Delhi Residence)
गायिका मैथिली ठाकूर यांची संगीत मैफील
’15, सफदरजंग लेन’ या संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत यांचे कुटुंबही दिल्लीतील निवासस्थानी आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले आहे.
पवार सहकुटुंब, भाजप खासदार येणार?
रात्रीच्या जेवणासाठी संजय राऊत यांनी राज्यातील सर्व खासदारांना बोलावलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार कुटुंबियासह उपस्थित राहणार आहेत. मात्र भाजपचे शिवसेनेशी संबंध बिघडलेले असल्यामुळे भाजपचे खासदार डिनरला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.
“गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही”
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणाची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचं कळलं. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रं काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. तो नीट वाचा. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काहीच नाही. सरकारने काही चुकीचं केलं अशी एकही ओळ नाही, असं राऊत म्हणाले. (Shivsena MP Sanjay Raut Dinner Diplomacy invites all Maharashtra MPs for Dinner at Delhi Residence)
दिल्लीला भिजलेले फटाके फोडण्याची सवय
कोणत्याही अधिकाऱ्याचं आक्षेपहार्य संभाषण झालं असेल तर ते तपासायला मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यासाठी दिल्लीत जायची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याने डेटाफाटा घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं. पुढचा शब्द मी सांगत नाही. या आपल्या घरातील गोष्टी असतात. त्या दिल्लीत जाऊन सांगायच्या नसतात. दिल्लीत असे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची सवय आहेच, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.
संबंधित बातम्या :
फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला : संजय राऊत
(Shivsena MP Sanjay Raut Dinner Diplomacy invites all Maharashtra MPs for Dinner at Delhi Residence)