मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला होता. या दाव्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. यावरुन अनेक राजकीय नेते टीका टिप्पणी करताना दिसत आहे. आता त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. “मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार,” असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटवरुन त्यांनी केंद्रावर टीकाही केली आहे. (Sanjay Raut Tweet on Kanjurmarg Metro Carshed)
“महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र!!,” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या सात बारा वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2020
दरम्यान मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. “महसुली नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे. जिल्हाधिकाऱ्याने ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.”
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिल्याने त्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut Tweet on Kanjurmarg Metro Carshed)
संबंधित बातम्या :
भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल
‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड