मुंबई : परिवहन खातं मुख्यमंत्री आणि अर्थखातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे असतानाही एसटी (State Transport) कर्मचाऱ्यांना पगारासाठी ताटकळत रहावं लागतंय.आगतिकतेने अनेक कर्मचारी जीवन संपवून घेण्याचा विचार करतायत. वेळेत पगार न मिळाल्याने सांगलीतील भीमराव सूर्यवंशी (Bhimrav suryawanshi) या एसटी चालकानं आत्महत्या केली. या आत्महत्येचं प्रायश्चित्त शिंदे सरकार कसं घेणार? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आलाय. मागील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देऊन त्यांची संक्रांत गोड केली, अशा बढाया मारणारे शिंदे फडवणीस सरकार आता का गप्प आहे, असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
राज्यात डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे विकास कामांचा धडाका लावलाय, असे ढोल गल्लीपासून दिल्लीपर्यंत बडवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्याची स्थिती विदारक आहे. हे चित्र समोर आणणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली. कवठे महांकाळ येथील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांनी पगार वेळेत न झाल्याने आत्महत्या केली. डबल इंजिन सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यावर जीव देण्याची वेळ का यावी, असा संतप्त सवाल सामनातून करण्यात आलाय.
एसटी महामंडळ सध्या तोट्यात आले. व्यवसायातील स्पर्धेचा फटका मंडळाला बसल्याने उत्पन्न कमी आणि खर्चाचा डोंगर वाढता आहे. या दुष्टचक्रात महामंडळ अडकले असताना एसटी कर्मचारीही या दुष्टचक्रात भरडले जावेत, असा त्याचा अर्थ नाही, ही काळजी सरकारने घ्यायला हवी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तत्कालिन सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. डंके की चोट पर.. आंदोलन करून मागण्या पूर्ण करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही सामनातून सडकून टीका केली आहे.
सांगलीतील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी या चालकाने वेतन वेळेत न मिळाल्याने केलेल्या आत्महत्येचं शिंदे सरकार काय प्रायश्चित्त घेणार, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एसटी कर्चाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने हवा दिल्याचं चित्र दिसून आलं होतं. आता वेतन वेळेत मिळाल्याच्या समस्येवरून मविआ शिंदे-भाजपला घेणारणार असं चित्र आहे.