मुंबई : शिवसेनेने (Shivsena) संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) सोबत युती केल्यापासून राज्यात भाजप आणि इतर संघटनांनी जोरदार टीका केली. कारण आत्तापर्यंत ब्रिगेड यांनी वारंवार हिंदु विरोधी भूमिका जाहीर केली आहे. सध्या सत्तेत असलेल्या अनेक आमदारांनी खासदारांनी सुध्दा अभद्र युती असल्याची टीका केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात भविष्यात सत्ताधाऱ्यांसमोर मोठ आवाहन उभं राहणार आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)यांनी पुन्हा शिवसेनेतील काही आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागच्या दोन महिन्यापुर्वी राज्यातील राजकारणात मोठा भुकंप झाला आणि नवं सरकार स्थापन झालं आहे.
चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विधान केलं होतं. त्यावर उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेतील काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून ते लवकरचं शिंदे गटात दाखल होतील असं म्हणटलं आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे शिंदे गटात दाखल होणारे नेमके कोण आमदार आणि खासदार आहेत याची चर्चा देखील जोर धरु लागली आहे.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली, राज्यामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सोबत अभद्र युती केली होती, त्याच पद्धतीची ही संभाजी ब्रिगेड सोबत अभद्र युती केलेली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शंभर टक्के हिंदुत्ववादी शिवसेनेला यामुळे तिलांजली देण्यात आली आहे. या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.