ईडी राऊतांच्या दारी, ते जेलची वारी! आतापर्यंत काय-काय घडलं?, वाचा सविस्तर…

| Updated on: Aug 01, 2022 | 12:44 PM

राऊतांच्या ईडी चौकशीतील 10 मोठे मुद्दे वाचा सविस्तर...

ईडी राऊतांच्या दारी, ते जेलची वारी! आतापर्यंत काय-काय घडलं?, वाचा सविस्तर...
संजय राऊत
Follow us on

मुंबई : मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Ed inquiry) यांना अटक केली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट इथल्या ईडीच्या कार्यालयात 9 तासांहून जास्त वेळ चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली असल्याचं ईडीच्या वतीने सांगण्यात आलं. राऊत तपासात सहकार्य करत नसल्यामुळे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) राऊतांची चोकशी आणि नंतर अटक केली. आज संजय राऊत यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिथे ईडी त्यांची कोठडी मागणी करणार आहे. राऊतांचं मेडिकल चेकअपही करण्यात येणार आहे. त्याआधी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिक याठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या दोन्ही गेटवर मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जे. जे. रुग्णालयाच्या आजूबाजूचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली आहे. आता त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  1. काल सकाळी 7 वाजता ईडीचं पथक शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी पोहोचलं. त्यांच्या मैत्री या बंगल्यावर कसून चौकशी आणि झाडाझडती झाली. मग संजय राऊत यांना काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास ईडीने ताब्यात घेतलं.
  2. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना दोनवेळा बोलावूनही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यानंतर काल सकाळी-सकाळी ईडीचं पथक चौकशीसाठी त्यांच्या घरी पोहोचलं. त्यांची चौकशी झाली.
  3. यादरम्यान संजय राऊत यांनी ट्विट करत काहीही झालं तरीही आपण झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं. खोटी कारवाई… खोटे पुरावे! मी शिवसेना सोडणार नाही… मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र!, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र आणि शिवसेना कायम लढत राहील, असा विश्वास शिवसैनिकांना दिला.
  4. तब्बल 9 तास चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं. यानंतर संजय राऊत भगवं उपरणं गळ्यात घालून आपला निर्धार पुनर्सुचित केला. त्यांनी हात जोडत उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले.
  5. हे सुद्धा वाचा
  6. आपण एक जबाबदार खासदार असून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी दिल्लीला जावं लागतं. दिल्लीला जाऊन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार आहे आणि त्यानंतर चौकशीला उपस्थित राहणार असल्याचं मी ईडीला सांगितलं. पण ते आज घरी आले. हरकत नाही, अश्या कारवायांना आम्हा घाबरत नाही, मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन, असं राऊतांनी सांगितलं.
  7. ईडीने त्याब्यात घेतल्यानंतर घरातून बाहेर पडण्यापूर्वी संजय राऊत यांनी आईचे आशिर्वाद घेतले. शिवाय आईला मायेची मिठी मारली. तेव्हा आई आणि राऊतांचे डोळे डबडबले. आईने औक्षण केल्यानंतर ते ईडी कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा शिवसैनिकांची गर्दी जमली होती.
  8. ईडी कार्यालयाकडे जाताना संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. अन् महाराष्ट्र दुबळा होत चालला आहे, पेढे वाटा, निर्लज्जपणाचा कळस आहे, असं म्हणत त्यांनी शिंदेगटाला टोला लगावला.
  9. या सगळ्यादरम्यान काँग्रेसच्या गोटात वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मोहित कंभोजदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं.
  10. या सगळ्यानंतर राऊतांना रात्री उशीरा अटक झाली. तशी घोषणा ईडीच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.
  11. आज संजय राऊत यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिथे ईडी त्यांची कोठडी मागणी करणार आहे. राऊतांचं मेडिकल चेकअपही करण्यात येणार आहे. त्याआधी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांना आता जेल होणार की बेल हे पाहाणं महत्वाचं असेल.