Sanjay Raut On Badlapur Rape Case : बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधित आहे. जर ती दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असत तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ त्या शाळेच्या पायऱ्यावर फतकल मारून बसले असते. आता ते का गेले नाहीत? असा रोखठोक सवाल ठाकरे सरकारचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापुरात झालेल्या घटनेवर भाष्य केले. तसेच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात घटना आणि अघोरी सरकार आहे. त्यांच्याकडे माणुसकी किंवा भावना असतील या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही. बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधित आहे. जर ती दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असत तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ त्या शाळेच्या पायऱ्यावर फतकल मारून बसले असते. आता ते का गेले नाही? असे संजय राऊत म्हणाले.
मधल्या काळात योगींचं जे बुलडोझर राज्य सुरु आहे. तसे काही ठिकाणी बुलडोझर चालवण्याचे काम शिंदे सरकारकडून केले जात आहे. हे बुलडोझर बदलापूरला का गेले नाही? पण याआधी अशाप्रकारच्या गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवण्यात आले आहेत. जनतेचा काल उद्रेक झाला होता. याला कायदेशीर भाषेत पब्लिक क्राय असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा अशाप्रकारे पब्लिक क्राय होतो, तेव्हा न्यायालयाने या घटनांची दखल घेतली आहे. मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही. कोलकात्यामध्ये घडलेल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जींचं सरकार आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
कोलकातापेक्षा बदलापुरातील जनतेचा संताप जास्त होता. पण तो पब्लिक क्राय, चिमुकल्यांचा आक्रोश हा न्यायालयाचे पडदे फाडू शकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली आहे. त्याची गरज काय? आरोपी पकडलेला आहे. पोलिसांकडून तपासही सुरु आहे. SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारने अनेक गुन्ह्यात ज्या SIT स्थापन केल्या होत्या, त्या गृहमंत्री झाल्यावर पहिल्या २४ तासात फडणवीसांनी रद्द केल्या. उद्धव ठाकरेंनी स्थापन केलेल्या SIT फार गंभीर गुन्ह्यातील होत्या, असेही संजय राऊतांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की फास्ट ट्रॅकवर केस चालवू असे म्हणाले. या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालायला हवा, तिथे हे दबाव आणून तारखांवर तारखा आणतात. त्यांच्या तोंडी फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.