नाशिक : “जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. पण जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला, तर काँग्रेस-राष्ट्रवादी याचा सकारात्मक विचार करेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी (chhagan bhujbal On shivsena) केले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं की उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी ठरवलं पाहिजे. तसेच शिवसेनेने हिंमत धरत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा दाखल करावा,” असेही छगन भुजबळ (chhagan bhujbal On shivsena) म्हणाले.
छगन भुजबळ यांनी येवला-लासलगाव परतीच्या अवकाळी पावसाने शेती पिकाची झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
“आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याचे यापूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद पाहिजे की मुख्यमंत्री पद हे त्यांनी अगोदर ठरवलं पाहिजे. तसेच शिवसेनेने हिंमत धरुन सत्तास्थापनेसाठी दावा केला पाहिजे. उद्या जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीकडे प्रस्ताव पाठवला तर त्याचा नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल,” असे सूचक वक्तव्यही छगन भुजबळ यांनी (chhagan bhujbal On shivsena) केले.
“परतीच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. राज्यापालांशी चर्चा करताना याची माहितीही आम्ही दिली. मात्र राज्यात सरकार नसल्याने योग्य निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. भविष्यात जरी राष्ट्रपती राजवट आली तरी ती फार दिवस राहणार नाही. येत्या 15 दिवसातच नवीन सरकार अस्तित्वात येईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल,” असेही ते म्हणाले.
येवला लासलगावमध्ये परतीच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात द्राक्षे, कांदे, भुईमूग, मूग यासह इत्यादी पिकांचेही फार नुकसान झाले (chhagan bhujbal On shivsena) आहे.
या शेती पिकाची नुकसानीची पाहणी करताना ते म्हणाले, “कुठं वाचलं आणि कुठं गेलं हे म्हणायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. सर्वच उद्धवस्त झालं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत ही तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना किमान दिलासा देण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. निफाड आणि येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली,” त्यावेळी ते बोलत होते.
“शेतकऱ्यांचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात यावे. कुठे कमी नुकसान आणि कुठे जास्त असे न दाखविता शेतकऱ्यांच्या हितासाठी पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी,” अशा सूचना भुजबळ यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.