“महाराष्ट्र भाजपच देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून आऊट करेल”; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

| Updated on: Aug 09, 2024 | 3:50 PM

"महायुतीकडून राज्याला रुग्ण अवस्थेत नेण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून तो प्रयत्न करु" असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र भाजपच देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून आऊट करेल; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
Follow us on

Sushma Andhare On Devendra Fadanvis : “राज्याचे सरकार अस्थिर करण्याचे काम जर गृह खात्याकडून होत असेल, तर अवघड आहे. आता असलेल्या काही पोलिसांवर खरंच ईडी कारवाई करण्याची गरज आहे. आमचं सरकार येऊ द्या, आम्ही त्यांच्यावर खरंच कारवाई करु, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

“…यांच्या राजकारणाची कीव येते”

“भाजपने काल एक रॅप प्रसिद्ध केला आहे. तो इतका गलिच्छ आहे. त्या रॅपमध्ये इंदिरा गांधी, पंडित नेहरु यांचा फोटो वापरला आहे. खूप गलिच्छ रॅप बनवला आहे. मला यांच्या राजकारणाची कीव येते. देवेंद्र फडणवीसांना हे माहिती नसेल की सध्या ते महाराष्ट्र भाजपच्या टार्गेटवर आहेत. तेच तुम्हाला या राज्यातून आऊट करतील. महाविकासआघाडी राज्यात एक मोठं बांधत आहे. महायुतीकडून राज्याला रुग्ण अवस्थेत नेण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून तो प्रयत्न करु”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

“जाती-पातीचं विष कालवायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले”

“हे आता कितीही लाडके लाडके म्हणत असतील तरी जनतेच्या मनात हे तिन्ही लोक आता दोडके झाले आहेत. हे मतांची कडकी झाले आहेत, म्हणून लाडके लाडके करत आहेत, हे जनतेला माहिती आहे. पण ते आता लाडके राहणार नाहीत. लोक तुम्हाला धडकी भरवतील. राज्यात जाती-पातीचं विष कालवायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता त्यांची माणसं हे काम करत आहेत”, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.

“राज्याच मंत्रिमंडळ लय भारी”

“पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे यांनी वाटोळं करून ठेवलं आहे. ससून मध्ये रक्त बदलतात, किडनी बदलतात, हे वाईट आहे. रुग्णालयात ड्रग्संच रॅकेट सापडत आहे, हे खूप दुर्देवी आहे. आरोग्य मंत्री भारी माणूस आहेत, एखादा आजार पाण्यामुळे होतो का डासांमुळे हेच त्यांना कळत नाही. ज्या माणसाकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो. ज्याला कृषीमंत्री केलं त्याला शेतीतलं काहीही कळत नाही, त्यामुळे आपल्या आपलं राज्याच मंत्रिमंडळ लय भारी आहे”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.