“…त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा

| Updated on: Sep 30, 2024 | 12:02 PM

कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे?" असा सवाल संजय राऊत यांनी केला.

...त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा
Follow us on

MP Sanjay Raut Target CM Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यातच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी रंगताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर पोहोचला आहात. ज्या दिवशी मोदी शाहांचा तुमच्या डोक्यावरील हात जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंवर टीका केली.

“कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात कोण?”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:ला ट्वीट करता येतं का? आम्ही त्यांना ओळखतो. ट्वीट करण्यांना आधी ट्रेनिंग द्या. कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सूरतला मोदी शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? मुख्यमंत्रिपदासाठी मोदी शाहांची धुणी भांडी करायला तुम्हीच गेला होतात. आताही दिल्लीत मोदी शाहांच्या उंबरठ्यावरील तुम्ही पायपुसणे आहात. ज्या दिवशी मोदी शाहांचा तुमच्या डोक्यावरील हात जाईल, त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची किंमत कचऱ्याचीही राहणार नाही”, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

“तुम्ही गुजरातच्या व्यापारी मंडळाचे गुलाम”

“हे ठाकरे घराणं आहे. या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर पोहोचला आहेत. ठाकरेंबद्दल बोलताना तुमचं पूर्वीचं आयुष्य काय होतं हे लक्षात ठेवा. तुम्ही गुजरातच्या व्यापारी मंडळाचे गुलाम आहात”, असेही संजय राऊत म्हणाले.