मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विधानसभा निकालात सर्वात जास्त जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसला 44 जागा (Maharashtra assembly election result 2019) मिळाल्या. शिवसेना-भाजप युतीला 161 तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 98 जागा (Amit Shah Call Uddhav Thackeray) मिळाल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन शुभेच्छा (Amit Shah Call Uddhav Thackeray) दिल्या आहेत.
अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना फोन करत महायुतीच्या यशाबद्दल शुभेच्या दिल्या. तसेच निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले आहे त्याबद्दलही अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच दिवाळीनंतर दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापनेपूर्वी बैठकीही आयोजित केली आहे. या बैठकीत कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबतचं चित्र स्पष्ट होणार (Amit Shah Call Uddhav Thackeray) आहे.
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक नक्की कधी, किती वाजता आयोजित केली आहे. याबाबत अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं आहे. शिवसेना 56 जागांसह (Shivsena MLA List) दुसऱ्या स्थानावर आहे.
भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र दिसत आहे.
(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)
महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
संबंधित बातम्या :
विधीमंडळात कोणत्या पक्षाचे किती आमदार धडकणार? पक्षनिहाय निकाल