मुंबई : आम्ही खरी शिवसेना आहोत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Enath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केला. त्यानंतर हा सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. कोर्टाच्या निर्णयानंतर आता यावर सुनावणीचा अधिकार निवडणूक आयोगाला मिळाला. त्यानंतर आज पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आयोगानं सांगितलं आहे. याबाबत दुपारी 2 वाजता सुनावणी होत आहे. मात्र या लढाईसाठी शिवसेना (Shivsena) किती तयार आहे?, भाजपचं म्हणणं काय आहे? हे पाहुयात…
दोन्ही बाजूने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आमचाच हक्क असल्याचं सांगण्यात येतंय. आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे धनुष्यबाण आमचा, असं शिंदेगटाचं म्हणणं आहे. तर आम्ही मूळ शिवसेना आहोत. पक्षाच्या घटनेनुसार धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा शिवसेनेचा आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी आजच्या सुनावणीबाबत माहिती दिली. धनुष्यबाण आमचाच असल्याचं देसाई म्हणालेत. याआधी शिवसेनेच्या अध्यपदाची निवडणूक झाली. त्यानुसार 2024 पर्यंत उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून राहतील, अशी तरतूद आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यांच्या संख्यकडे पहावं. आमच्याकडे अधिकृत सर्व कागदपत्रं आहेत.या गोष्टीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतली अशी अपेक्षा आहे. चिन्ह गोठवण्यासंदर्भात कुठेलीही संकेत सध्यातरी नाहीत, असं अनिल देसाई म्हणालेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी TV9 मराठीशी बोलताना धनुष्यबाण शिंदेगटाकडेच राहील, असं सांगितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू कोर्टात मांडली आहे. माझ्यासकट भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असा विश्वास वाटतो. एकनाथ शिंदे मी त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार ते बाळासाहेबांच्या विचारासोबत आहेत. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन विषयावरील हे पुढे घेऊन जात आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार, असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.