महेश सावंत, सिंधुदुर्गः सुप्रीम कोर्टात (Supreme court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाना (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्षाविषयीचा निर्णय देणं म्हणजे एक राजकीय भूकंप समजला जातोय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी आयोगानं निर्णय देऊ नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र शुक्रवारी अचानक हा निर्णय आयोगाचा निर्णय धडकला अन् उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र हजारो शिवसैनिकांनी पक्ष आणि चिन्ह गमावण्याची मानसिक तयारी केली होती, अशी पहिलीच प्रतिक्रिया एका आमदाराने दिली आहे. कणकवलीत वैभव नाईक यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
गेल्या २० जूननंतर हा निर्णय होणार होता, याची जाणीव होती. अंधेरीची निवडणूकदेखील आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार होतो. त्यामुळे पक्ष, पक्षाचं चिन्ह जाणार होती, ही जाणीव शिवसैनिकांना अनेक दिवसांपासून होती. शिवसैनिकांची मानसिकताही होती, अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली. आज मंत्री, आमदार अनेक पक्षातून आले. मी आमदार झालो तर मी घाम गाळला म्हणून नाही तर माझ्याआधी अनेक शिवसैनिकांनी घाम गाळला, रक्त गाळलं म्हणून आम्ही आहोत. ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, ते जागेवरच आहेत. त्यामुळे हेच शिवसैनिक आम्हाला पुन्हा निवडून देतील. आमची ताकद म्हणून उभे राहतील, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचीही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ आयोगाकडून निष्पक्ष निर्णय अपेक्षित होता. कालचा निर्णय धक्कादायक होता. पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आगामी काळात सर्वजण ताकद लावून लढू. पण शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या ताकतीने पुन्हा लढाई केली, त्याच मार्गाने उद्धवजींना जावं लागेल, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय.