मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Citizenship Amendment Bill 2019 ) यांनी रखडलेल्या खातेवाटपावरुन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 13 दिवस झाले तरी खातेवाटप नाही, सध्या केवळ स्थगितीच्याच बातम्या येत आहेत, नागपुरातील अधिवेशन केवळ नावापुरतं होत आहे, अद्याप खातेवाटपच नाही तर मग उत्तरं देणार कोण?, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Citizenship Amendment Bill 2019 ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.
नागपुरात किमान दोन आठवडे अधिवेशन घ्या ही आमची मागणी फेटाळली आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती तातडीने मिळावी ही आमची अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने काल पाठिंबा दिला, मात्र आज मुख्यमंत्र्यांनी संधिग्दता व्यक्त केली आहे, लोकसभेत विधेयक पास झालं, मात्र राज्यसभेत काँग्रेसच्या दबावानंतर भूमिका बदलली का? राज्य सरकार टिकवण्यासाठी भूमिका बदलली का?, शिवसेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, ते कुणाच्याही दबावाखाली जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, पण राज्यसभेत त्यांची भूमिक संदिग्ध वाटत आहे. अनेक पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. पण राज्यसभेत संदिग्ध भूमिका का, काँग्रेसकडून दबाव आलाय का? शिवसेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, ते कुणाच्याही दबावाखाली जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे – देवेंद्र फडणवीस
विधासभेचे अधिवेशन पाच-सहा दिवसाचे आहे, हे अधिवेशन फॉरमॅलिटी म्हणून ठेवलेले आहे असं वाटते. बरेच दिवस झाले पण अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आम्ही सरकारला मदत आणि समर्थन करु, पण त्यांनी काम केले पाहिजे, पण हे सरकार सर्व प्रोजेक्टला स्थिगिती देत आहे. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.