रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला (NCP seats in chiplun) जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या जागांपैकी चार जागांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. मात्र बालेकिल्ला असलेल्या चिपळूणचा गड काही शिवसेनेला सर करता आला नाही. लोकसभेला 50 हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळूनही विधानसभेत मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला (NCP seats in chiplun) आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरीचा गड सेनेनी राखला. पण हा गड राखताना सेनेचा एक बुरुज ढासळला. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे शेखर निकम या ठिकाणी विजयी झाले.
लोकसभेला चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना 50 हजाराहून अधिक मताधिक्य असताना विधानसभेला फासे फिरले. पण हे फिरलेले फासे सेनेच्या जिव्हारी लागले. सेनेचा बालेकिल्ला म्हणवणाऱ्या अनेक गटात सेनेऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची सरशी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम हे 29 हजार 924 मतांनी निवडून आले आहे. त्यांना 50 हजारांचे मताधिक्याने विजयी (NCP seats in chiplun) झाले.
चिपळूणात तिवरे धरण फुटीचा परिणाम सुद्धा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भोगावा लागला. हा मुद्दा विरोधी पक्षाचे प्रमुख कारण बनला. तर या धरण फुटीची नाराजी अनेक मतदारांनी मतदानातून व्यक्त केली. 2009 पासून ते 2019 च्या निवडणुकीपर्यंत सेनेच्या मतदारांचा टक्का घसरला गेल्याचेही समोर आले आहे.
चिपळून विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेला 50.11 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये सेनेचे मताधिक्य घटून ते 45.16 टक्क्यांवर आले. त्यानंतर आता 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 57.09 टक्के मतदान झाले.
सदानंद चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार होणार होते. 2004 मध्ये भास्कर जाधव सेनेतून बाहेर पडल्यानंतर सदानंद चव्हाण यांनी हा मतदारसंघ बांधला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे हा पराभव शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. शिवसेनेनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा जिंकल्या. पण चिपळूणच्या जागेवर झालेला सेनेचा पराभव नक्कीच गड आला पण सिंह गेला असाच म्हणावा लागणारा ठरला.
संबंधित बातम्या :
शिवसेना खासदार संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, शरद पवारांची भेट!
आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला
कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आला नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल