मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) सध्या आक्रमक शैलीत शिवसेनेच्या बंडखोर गटावर टीका करत आहेत. त्याला आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. “संजय राऊत मृतदेहांची भाषा करतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, धमक्या इतरांना द्या आम्ही खपवून घेणार नाही”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय आणि थेट संजय राऊतांनाच आव्हान दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. “हे बंड नाही तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना आहेत. संजय राऊत गुवाहाटीमध्ये मृतदेह असल्याची भाषा करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी इतरांना धमक्या द्याव्यात पण आम्हाला नाही. आम्ही त्या खपवून घेणार नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
It is not a rebellion but what the people of Maharashtra want. What does he (Sanjay Raut) mean by “bringing bodies from Guwahati”? This is not the culture of Maharashtra. He should threaten other people but not us: Shrikant Shinde, Shiv Sena MP and son of Eknath Shinde, in Thane pic.twitter.com/wb71xWG0Ct
— ANI (@ANI) June 27, 2022
गुवाहाटीमधील बंडखोर आमदार हे जिवंत प्रेतं आहेत, त्यांच्या शरीरातील आत्मा कधीच मेलाय, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली होती. दहिसरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला.
संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानं बंडखोर आमदारांना संताप व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जर आम्ही प्रेतं असू, तर याच प्रेतांनी तुम्हाल राज्यसभेवर निवडून आणलं आहे, असंही ते म्हणालेत. त्यामुळे बेताल वक्तव्य करण्याआधी तुम्ही राज्यसभेची खासदारकी सोडा आणि पुन्हा निवडणूक येऊन दाखवा, असं म्हणत दीपक केसरकर यांनी राऊतांना उत्तर दिलंय. राऊत जेवढ्या वाईट भाषेत बोलणार, तेवढी आमची ऐकी वाढणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवला.